नागपुर – शरद नागदेवे
मानव अधिकार संरक्षण मंच द्वारे कंत्राटिकरण – संविधानावर केलेला सुनियोजित हल्ला या विषयावर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना येथे अभ्यासपूर्ण कार्यक्रम घेऊन शासना विरोधात संविधानिक मार्गातून राज्यभर जनजागृती करून आंदोलने आणि हायकोर्ट पासून ते सुप्रीमकोर्ट पर्यंत लढण्याचा निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भन्ते धम्मसारथी तसेच ऍड. राहुल तेलंग सर होते. शासनाने परिपत्रक काढून संविधानाच्या कलम 13(1), 13(2), 14, 21, 32, 309 चे कश्याप्रकारे जाणीवपूर्वक उल्लंघन केले याबाबतची सविस्तर माहिती ऍड. राहुल तेलंग यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एचआरपीएफ चे सचिव विद्यार्थी नेते आशिष फुलझेले यांनी तर समारोप सुरज यांनी केला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित शिक्षण तज्ज्ञ रमेश बिजेकर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.