Baluchistan Bomb Blast : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बॉम्बस्फोट झाल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. तर वृत्त्वाहीनी अलजजिरा यांनी ट्वीट करीत दिलेल्या माहितीनुसार, झालेल्या स्फोटात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पोलिस दलातील काही लोकांचाही समावेश आहे. इतर अनेक जण जखमी झाले आहेत.
बलुचिस्तानच्या मस्तुंगमधील अल फलाह रोडवर असलेल्या मदिना मशिदीजवळ स्फोट झाला. सर्व लोक ईद मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीत भाग घेण्यासाठी तेथे जमले असताना हा प्रकार घडला. डॉन वृत्तपत्राने शहीद नवाब गौस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सईद मिरवानी यांच्या हवाल्याने मृत्यूची पुष्टी केली आहे. सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, स्फोटात एका पोलिस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की हा स्फोट आत्मघाती स्फोट होता, जो डीएसपी गिसकौरी यांच्या कारजवळ स्फोट झाला.
More than 50 people have been killed in a suspected suicide bomb attack in Pakistan’s Balochistan province, where an explosion hit a procession to celebrate the birthday of the Prophet Muhammad ⤵️ pic.twitter.com/X98efcZ6uM
— Al Jazeera English (@AJEnglish) September 29, 2023
बलुचिस्तानचे अंतरिम माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आले आहे. ते म्हणाले की, गंभीर जखमींना क्वेट्टा येथे नेण्यात येत असून सर्व रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. जान अचकझाई म्हणाले, आमच्या शत्रूंना परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे. स्फोट असह्य आहे.
पाकिस्तानचे अंतरिम गृहमंत्री सर्फराज अहमद बुगती यांनी या स्फोटात प्राण गमावलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि स्फोटाचा निषेध केला आहे. बुगती म्हणाले की, दहशतवाद्यांचा कोणताही धर्म किंवा श्रद्धा नसून बचाव मोहिमेदरम्यान सर्व संसाधनांचा वापर केला जात आहे. जखमींवर उपचार करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही आणि दहशतवादी घटक कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत, असे ते म्हणाले.