Sunday, December 22, 2024
Homeराज्यवारकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच तालुकास्तरावर बैठकांचा आयोजन - वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष...

वारकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच तालुकास्तरावर बैठकांचा आयोजन – वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील…

सांगली – ज्योती मोरे

वारकरी सांप्रदायाचं साहित्य हे मानवतावादी साहित्य असून वारकरी सांप्रदायाची चेष्टा मस्करी कधीही होता कामा नये.वारकऱ्यांनीही कोणत्याही निमित्तानं राजकारण्यांसमोर मर्यादा सोडून नतमस्तक होऊ नये,व्यसनमुक्ती विभागाकडून खर्च केले जाणारे कोट्यावधी रुपये अखंड हरिनाम सप्ताहासह दिंडीसाठी देण्यात यावेत,प्रत्येक गावात टाळ,

विना, पखवाज दिला पाहिजे,शिवाय वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थांना दरमहा एक लाख रुपये अनुदान देण्यात यावं. या मागण्यांसाठी लवकरच वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं, तालुका स्तरावर बैठका आयोजित करणार असल्याचं अध्यक्ष विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: