रामटेक – राजु कापसे
दिनांक २१/०९/२०२३ रोज गुरूवार ला श्री गुरुदेव सभागृह, बाजार चौक, चाचेर येथे मा.आ.श्री. सुनील बाबू केदार (माजी मंत्री) व मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या अध्यक्षतेत जन संवाद सभा चे आयोजन करण्यात आले.
ज्यात चाचेर-निमखेडा जिल्हा परिषदेतील रस्ते व नालीचे दुरव्यवस्था, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, सुशिक्षित युवकांना रोजगार नाही, अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाई त्वरित मिळत नाही, कुठलाही शासकीय निमशासकीय काम-काजात पारदर्शता नाही इत्यादी विषयांना तोंड द्यावा लागतो करिता यावर कश्या प्रकारे मात करता यावा व त्वरित निराकरण होऊन शेतकरी वर्ग, युवक वर्ग व जनसामान्यांना न्याय मिळवता येईल व परीसराला नवीन दिशा देवून परिवर्तन घडवता येईल या उद्देशाने जनसंवाद सभा ला ग्रामवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला.
तसेच चाचेर बस स्टॉप ते बाजार चौक पर्यंत रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सौ. रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्षा जि. प. नागपूर), सौ. अवंतिकाताई लेकुरवाडे (सभापती जि. प. नागपूर), सौ. शालिनीताई देशमुख (सदस्य जि. प. नागपूर),
श्री. दुधराम सवालाखे (सदस्य जि. प. नागपूर) श्री. योगेश देशमुख (सदस्य जि. प. नागपूर), श्री. स्वप्निल श्रावणकर (सभापती पं. स. मौदा), श्री. राजेश ठवकर (सभापती कृ. उ.बा. स. मौदा), श्री. ज्ञानेश्वर वानखेडे (अध्यक्ष ता. काँ. क. मौदा), श्री. लक्ष्मण उमाळे (माजी सभापती), श्री. शेषराव देशमुख (कार्याध्यक्ष मौदा ता. काँ. क.),
सौ. लुंबीनीताई कलारे (सरपंच चाचेर ग्रा.पं.) सौ. ममताताई नौकरकर सरपंच (नंदापुरी ग्रा.पं.), श्री. उमेश झलके (सरपंच बार्शी दुधाला ग्रा.पं.), श्री. संकेत झाडे (सरपंच खंडाळा ग्रा.पं.), सौ. नागाताई कडू (सरपंच नेरला ग्रा.पं.), श्री. अनिल कोंगे, श्री. बाळकृष्ण खंडाईत, श्री. दामोधर धोपटे, श्री. पि टी रघुवंशी, श्री. शंकर झलके,
श्री. मदन बरबटे, श्री. महेश कलारे, श्री. मनोज नोकरकर, श्री. शैलेश कोपरकार, श्री सुरेश बंधाटे ,श्री. सुखदेव भिवगडे, श्री. रत्नाकर बरबटे, श्री. विनायक काटकर इत्यादी मान्यवर व ग्रामवासिगण उपस्थित होते.