पनवेल – किरण बाथम
जवाहरलाल नेहरू बंदरामधील सेझ विभागात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उदघाट्न जेएनपीएचे चेअरमन संजय सेठी यांच्याहस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी स्टेट बँकचे मुंबई मेट्रो विभागाचे जी. एस. राणा यांसह मुंबई-पूर्व विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर सनातन मिश्रा, मुख्य प्रबंधक आलोककुमार सिंग, रायगड विभागीय व्यवस्थापक राघवेंद्र कुमार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला शाखेच्या नामफलकाचे आणि शाखेचे फित कापून उदघाट्न करण्यात आले. त्यानंतर प्रशस्त सभागृहात समारंभ साजरा झाला. जी. एस. राणा यांनी उदघाटक संजय सेठी यांचे यथोचित स्वागत केले. सेठी यांनी स्टेट बँकेच्या शाखेच्या उदघाट्ना बद्दल खूप समाधान व्यक्त केले.
सेझच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या भविष्यातील मोठया व्यावसायिक वाढीमध्ये जवाहर लाल नेहरू पत्तन आणि स्टेट बँक एकमेकांना साह्य करत सकारात्मक कार्य करू असे आवाहन त्यांनी केले.जी. एस. राणा यांनी स्टेट बँक आपल्या सर्वोत्तम सेवेच्या माध्यमातून सेझ विभागाच्या या शाखेमधून नवा आयम निर्माण करण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
सुरुवातीला संजय सेठी यांचे स्वागत करण्यात आले. स्टेट बँक अधिकारी वर्गाने आपल्या समायोचित विचारात भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. ओंकारनाथ चौधरी यांनी स्वागतपर विचार मांडले तर सनातन मिश्रा यांनी आभार मानले.