Saturday, September 21, 2024
Homeराज्यसांगली | माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक १४...

सांगली | माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक १४ मधील रस्ता नागरिकांसाठी खुला…

सांगली – ज्योती मोरे

सांगली – प्रभाग १४ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागे सन्मती मेडिकल समोर रोडवर आर सी सी गटारीचे काम झाले होते, तिथे मातीचे ढीग आहेत तसे ठेवले होते, पण गणपती उत्सव असलेने लोकांना ये जा करण्यास अडचण येत होती, त्यामुळे नागरीकांच्या तक्रारी येत होत्या.

त्यामुळे ३-४ दिवसापूर्वी संबधित ठेकेदार यांना मातीचे ढीग काढून घेणे याबाबत कळवले होते, पण काम नुसतेच झाले असलेने त्यावरून मोठी वाहने गेली तर केलेले काम खराब होणार, म्हणून तात्काळ ढीग काढले न्हवते. त्यांनी ४ दिवसापूर्वीच सोमवारी मातीचे ढीग काढून घेऊन रस्ता मोकळा करून देतो असा शब्द दिला होता.

त्याप्रमाणे आज संबंधित ठेकेदारांनी आज मातीचे ढीग काढून घेण्यास सुरुवात केली . त्यावेळी जागेवर जाऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांनी चालू कामाची पाहणी केली व त्यांना लवकर रस्ता रिकामा करून रस्ता स्वच्छ करून देण्याच्या सूचना वजा विनंती केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: