कार्यक्रमाला बेटा – बेटी बचाव नशा हटाव समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय सचिवांची उपस्थिती
रामटेक – राजु कापसे
शहरासह ग्रामीण भागात युवा पिढीमध्ये व्यसनाचे प्रमाण वायु वेगाने वाढत आहे. यात विशेषतः युवा वर्ग भरकटलेला असून युवक युवती हे देशाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहेत व ते सक्षम राहिले तरच देशाची प्रगती निश्चितपणे होऊ शकते तेव्हा त्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे असे प्रतिपादन नुकत्याच रामधाम येथे १४ सप्टेंबर ला झालेल्या बेटा – बेटी बचाओ नशा हटाव या राष्ट्रीय अभियान कार्यक्रमात पर्यटक मित्र तथा बेटा बेटी बचाव नशा हटाव समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने बेटा – बेटी बचाव नशा हटाव समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इश्वर उमरे व राष्ट्रीय सचिव ज्योती इश्वर उमरे ( मध्यप्रदेश ) हे उपस्थित होते. 14 सप्टेंबरला भर पावसातच दुपारी बारा वाजता दरम्यान या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रारंभी कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर उमरे, राष्ट्रीय सचिव ज्योती उमरे, महाराष्टाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे , अजय खेडगरकर यांचेसह विविध मान्यवरांचा शाल, गुलदस्ता व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर भाषणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली त्यामध्ये बेटा बेटी बचाव नशा हटाव समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर उंबरे यांनी सांगितले की मध्यप्रदेशमध्ये गावागावत तथा शाळांमध्ये जावून आम्ही या अभियानाची जागृकता करीत आहे. भारतभर हा उपक्रम सुरु असुन व्यसनाच्या विळख्यात असणाऱ्या तरुण पिढीला वाचविणे हा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रीय सचिव ज्योती उमरे यांनी सांगीतले की ५ वर्षापासुन हा उपक्रम सुरु असून तो गावागावात राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रपाल चौकसे यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. हे अभियान संपुर्ण भारतात रजीस्टर्ड आहे. मी एक जनप्रतिनिधी आहे. सध्याच्या पिढीतील बहुतांश मुले संस्कारहिन असुन गावखेड्यात व्यसनाचे प्रमाण ज्यास्त आहे. व्यसनामुळे तरुण पिढीपासून रोजगार, शिक्षण दुर सारावले जात आहे, मुली व मुलांना व्यसनापासुन दुर करायचे आहे. राष्ट्राला पुढे नेण्यासाठी संकल्प करण्याची आज गरज असल्याचे ज्योती उमरे यांनी सांगीतले.
संचालन मोहन कोठेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. इर्फान अहमद यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये पी टी रघुवंशी , हेमंत जैन , गोपाल कडू , विशाखाताई ठमके , शोभाताई राऊत , शारदाताई बर्वे , रंजनाताई मस्के , आरिफ मालाधारी , विमलताई नागपुरे , बबलू दूधबर्वे , मोहन कोठेकर , सुभाष नागपुरे , अजय खेडगरकर , रितेश कुमरे , मंगेश कठौते , सोनालीताई मुदलगयार, रवी बावनकुळे ,धर्मेंद्र दुपारे, ऋप्ती करुडकर, डॉक्टर इरफान अहमद, दिनेश उके, रामदास नागपुरे , शिवराम महाजन , प्रीतम महोबिया तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते.