कार्यक्रमाला रामटेक विधानसभेचे माजी आमदार श्री.मल्लिकार्जून रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती…
रामटेक – राजु कापसे
भारतीय जनता पार्टी, नागपूर जिल्हाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी पुढे होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोन पुढे ठेऊन आपल्या भारतीय जनता पार्टी, नागपूर जिल्ह्याची कार्यकारणी ची घोषणा केली.
रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक मंडळ अध्यक्ष पदी राहुल किरपान, पारशिवनी मंडळ अध्यक्ष पदी योगेश वाडिभस्मे तर आदिवासी बहुल असलेल्या देवलापार मंडळ अध्यक्ष पदी संजय(बंटी) गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा टीम मध्ये सरचिटणीस पदी रिंकेश चवरे तर उपाध्यक्ष पदी राजेश ठाकरे, जिल्हामंत्री अतुल हजारे,
जिल्हामंत्री शालिनीताई बर्वे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष पदी रामभाऊ दिवटे, किसान आघाडी महामंत्री म्हणून लक्ष्मण केने, आदिवासी आघाडी महामंत्री योगराज टेकाम, महिला आघाडी महामंत्री लता कांबळे, भारतीय जनता युवा मोर्चा महामंत्री पदी नंदकिशोर चंदणखेडे, संजय गांधी निराधार समिती पारशिवनी येथे नियुक्त झालेले मनोज गिरी यांचे शाल व श्रीफळ देऊन माजी आमदार श्री. मल्लिकार्जून रेड्डी यांचा हस्ते अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आले.
मागील कार्यकाळात उत्तम कामगिरी करणारे तिन्ही मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे महामंत्री यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री.मल्लिकार्जून रेड्डी, माजी आमदार तथा भाजपा निमंत्रित प्रदेश कार्यकारणी सदस्य, माजी नगराध्यक्ष श्री.दिलीप देशमुख, जिल्हापरिषद सदस्य सतीश डोंगरे, डाॅ.दिनेश बादुले, ज्योतीताई कोल्हेपरा,
माजी नगरउपाध्यक्ष आलोक मानकर, बाजार समिती रामटेक चे सदस्य,उपसरपंच योगेश मात्रे, माजी नगरसेवक अनिता टेटवार, रामानंद अडामे, मंसाराम अहिरकर ,डाॅ.विशाल कामदार, सरपंच महेश कलारे सुखदेव शेंद्रे, करीम मालाधारी, संदीप उरकुडे, समर्थ सर, विजय हारोडे, विलास मेश्राम, गुरुदेव चकोले, सैलेश शेळके,
महेश धूर्वे, नंदकिशोर पापडकर, रामटेके जी, रवींद्र भोंडेकर, धर्मेंद्र शुक्ला शिशुपाल गराडे, भास्कर राऊत, गोपी भाऊ कोल्हेपरा, नंदकिशोर कोहळे सहित भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.