आकोट – संजय आठवले
आकोट तालुका व शहरातील शेतकरी तथा सामान्य लोकांना कराव्या लागणाऱ्या विविध संदर्भातील समस्यांचा निपटारा करण्याचे मागणी करिता प्रहार जनशक्ती पक्षाने आकोट वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे कि, तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण भागातील नियमीत तथा अतिरिक्त भारनियमन बंद करण्यात यावे. नवीन वीज जोडणी प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे. सध्या आगामी दिवसात गणेश उत्सव, दुर्गादेवी, ईद मिलादुन्नबी असे उत्सव येत आहेत. सणवारांच्या या दिवसात वीज भारनियमनाने सण उत्सवांमध्ये विघ्न निर्माण होत आहे. त्याकरिता वीज कंपनीने नागरिकांना दिलासा द्यावा.
नविन मिटरकरिता अर्ज केल्यानंतर काही दिवसातच नवीन वीज मीटर देण्यात येते. मात्र कार्यालयामार्फत तीन तीन चार चार महिने विज मिळणेबाबतची कार्यालयीन प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्याने शेतकरी तथा गरीब अर्जदारांना कार्यालयात चकरा माराव्या लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबींची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी असेही या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, प्रहार युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, प्रहार तालुकाप्रमुख गणेश गावंडे, प्रहार शेतकरी आघाडी भैय्या डिक्कर, ज्ञानेश्वर दहीभात, पंचायत समिती सदस्य, शुभम नारे, तालुका संघटक अवि घायसुंदर, प्रहार युवक शहर प्रमुख बल्ली राजा, बंटी भाऊ पांडे, तालुका युवक संघटक शेखर बेंडवाल, संदीप मर्दाने, पंकज हाडोळे, शाहरुख, आशिष गीते, चेतन मर्दाने,सागर फुंडकर, ऋषी गीते, पवन बंकुवाले, राहुल वाकोडे, सचिन काळे, शेखर साबळे, पवन बाणेरकर,
युवक शहर उपाध्यक्ष ओम गवई, शहर संघटक दीप लोणकर, कोषाध्यक्ष कृष्णा काकड, प्रहार रुग्णसेवक अकोला मुरकर, अमित बेंडवाल, नाजीम भाई, पियुष बिजवे, श्याम साबळे, शहजाद, समी जमदार, अलीम मौलाना, विलास कडू, जगदीश शेळके, गोपाल लोडम, पिंटू ओहेकर, मोहम्मद दानिश, समर्थ आवारे सौरभ मुरकुटे, अक्षय ठोकळ, शुभम झापर्डे, गणेश आवारे, यश मर्दाने, सागर तायडे, प्रसाद कुलट, जयेश साविकार, प्रथम गावंडे, विजय मानकर, सौरभ जायले, कुणाल पवार, अजय मानकर, राहुल छापरवाल, रोहन बिहारी, अमित गावंडे, सागर कडू, सुरेश झटाले यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.