पोळा साध्या पध्दतीने साजरा करावा….. देवेंद्र देशमुख
खामगांव – राज्यासह जिल्ह्यात गोवंशीय पशुधनावरील लम्पी चर्मरोग वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर १४ सप्टेंबर २३ रोजी बैलपोळा सण घरगुती पध्दतीने साजरा करण्याबाबतचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जुने मारोती मंदीर, फरशी भागात दरवर्षी भरणारा पोळा यावर्षी साध्या पध्दतीने करण्याचे ठरले आहे.
ज्याप्रमाणे कोवीड काळात नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली तशीच काळजी आपल्या वृषभ राजाची घेणे गरजेचे आहे. दरवर्षी प्रमाणे देशमुख, वनारे, क्षिरसागर यांच्या परिवाराच्या गुढ्यांची परंपरागतरित्या तुळजाभवानी मंदीर तसेच जुना मारोती मंदीर येथे पुजन करण्यात येणार आहे.
तरी शेतकरी बांधवांनी आपल्या वृषभ राजाचे आपल्या घरीच पुजन करावे व आपल्या पशुधनाचे संरक्षण करण्याचे आवाहन देवेंद्र देशमुख, अनंता वनारे, कृष्णा पाटील, विष्णु क्षिरसागर यांनी केले आहे.