Sunday, November 17, 2024
Homeसामाजिकतिर्थक्षेत्र लाखपुरी येथे कावड यात्रेची जय्यत तयारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी...

तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे कावड यात्रेची जय्यत तयारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी…

लाखपुरी – ०८ तिर्थक्षेत्र श्री लक्षेक्ष्वर संस्थान लाखपुरी ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथे श्रावण महिन्यात शेवटच्या रविवारी दि. १० सप्टेबर २०२३ कावड यात्रा संपन्न होणार आहे. कावड यात्रेत मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील हजारो शिवभक्त सहभागी होणार आहे. शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री लक्षेक्ष्वर संस्थान व प्रशासन यांनी विविध उपाय योजना केल्या आहे.

कावड यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असून आज यात्रा स्थळाची पाहणी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदिप अपार ,तहसीलदार शिल्पा बोबडे , ग्रामिण पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांनी पाहणी करून विविध सूचना केल्या.यावेळी विस्तार अधिकारी विजय किर्तने.

मंडळ अधिकारी राजु जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव ,तलाठी संदिप बोळे , मा. बावणे , सरपंच राजप्रसाद कैथवास , संस्थानचे सेवाधारी चंद्रजीत देशमुख, नाना मेहर, त्रीलोक महाराज, प्रमोद अवघड, नजाकत पटेल, ओम बनभेरू, दिगंबर नाचणे, प्रेम कैथवास, देविदास चव्हाण, तुळशीराम वरणकार,सूरज कैथवास नितीन सुरजुसे,

दत्ता जामनिक , प्रमोद लोखंडे , दिलीप सुरजुसे ,सुरेंद्र जोगी , श्रीकांत देशमुख,आकाश जोगी , लादू महाराज ,विजय तामसे , मंगलसिह चौहान ,सचिन तामसे , गुड्डू शर्मा, पिट्टू कैथवास उपस्थित होते. उपस्थित अधिकारी यांचे संस्थान तर्फे स्वागत करण्यात आले. बैठकीचे संचालन संस्थानचे अध्यक्ष राजुभाऊ दहापुते यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: