गडचिरोली:.. ताणबोडी – वेलगुर – बोटलाचेरु मार्गावरून भविष्यात सुरजागड लॉईड मेटल कंपनीच्या अवजड वाहतुकिस परवानगी देण्यात येऊ नये. जर ही परवानगी देण्यात आली तर या विरोधात काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
अहेरी – अहेरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ. निसार (पप्पू) हकीम यांनी म्हटले आहे की, सुरजागड लॉयड अँड मेटल कंपनीच्या अवजड खनिज वाहतुकीस मार्ग क्र. ६४ (ODR Z.P.) टोला-ताणबोडी – वेलगुर – बोटलाचेरु या ग्रामीण मार्गअंतर्गत प्रशासणाने परवानगी देण्यात येऊ नये.
या ग्रामीण मार्गावरून अवजड वाहतुकीस परवानगी दिल्यास सदर रस्त्या लगत असलेली गावे येलचील, बोटलाचेरू, वेलगूर किष्टापूर, विजयपूर, ताणबोडी, शिवलिंगपूर, इतलचेरू या गावाच्या लोकांना नरक यातना भोगाव्या लागणार आहेत. कारण त्यांचे मुख्य व्यवसाय शेती व शेती पूरक व्यवसाय हेच आहे. भविष्यात हजारोंच्या संख्येने होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्या लगतची ही गावे प्रदूषण आणि लोह खनिजाच्या धुळी मुळे इथल्या मातीच्या भौतिक-रासायनिक गुणधर्मांवरच परिणाम करणार आहे.
त्यामुळे शेतजमिनी, गूरे -ढोरे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येणार आहे. याच आरक्षित ग्रामीण मार्गावरून दररोज शेकडो विध्यार्थी अहेरी / आल्लापल्ली येथे शिक्षणाकरीता ये – जा प्रवास करतात, त्यांचे ही शैक्षणिक भवितव्य अंधारात सामावून जाईल, असा आरोप अहेरी काँग्रेस तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केला आहे.
ताणबोडी या गावालगत नवीन चालू होणाऱ्या सुरजागड लॉयड अँड मेटल कंपनीचे (डम्पिंग यार्ड ) लोहखनिज कच्चा माल लोडींग- अनलोडींग खाणकाम प्रक्रियेमुळे भविष्यात धूप सिंकहोल्स, जैवविविधतेचे नुकसान तसेच उत्सर्जित धुळीकन प्रदूषणामुळे इथल्या शेती,जमिनी, शेततळे, विहिरी, भूजल पृष्ठभागाचे, पिण्याचे पाणी देखील दूषित होईल.
काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की हा ग्रामीण मार्ग आणि डम्पिंग यार्डच्या लगतचा हा भाग संविधानाच्या २४४ कलमान्वये ५ व्या सूचीत समाविष्ट आहे व इथे स्वशासन असून महामहीम राज्यपाल अधिनिस्त आरक्षित राखीव क्षेत्र आहे. इथे दारिद्र रेषेखालील शेती करणारे, शेतमजूर, अल्पभूधारक लोकं वास्तव्यात आहे व त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती असल्यामुळे याचा सरळ परिणाम त्यांचा जीवनावरच होणार आहे.या भागात राहणारा आदिवासी समाज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे.
एका खाजगी लोहखनिज औधोगिक कंपनीला या ग्रामीण भागातून वाहतुकीस परवानगी देण्यात आल्यास आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या आदिवासी समाजावर हा अन्याय ठरेल .काँग्रेस पक्षातर्फे मागणी केली आहे की शासन व प्रशासनाने या गंभीर मुद्द्याची तात्काळ दखल घेत ताणबोडी – वेलगुर – बोटलाचेरु मार्ग क्र.६४ (ODR Z.P.) मार्गावरून भविष्यात होणारी सुरजागड लॉईड मेटल कंपनीच्या अवजड वाहतुकीस परवानगी देऊ नये. सोबतच डम्पिंग यार्ड, कच्चा माल साठवणूक परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा.
अन्यथा अहेरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटी च्या वतीने अहेरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल .असे निवेदन अहेरी तालुका काँग्रेस कमिटी शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणात आले यावेळी अहेरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ. निसार (पप्पू) हकीम, रज्जाक पठान,नामदेव आत्राम, मधुकर सडमेक,रवी धानोरकर, गणेश उपलपवर,विनोद मडावी ,सुरज आत्राम,विलास सडमेक,सतीश मडावी,अजय नैताम,किशोर सडमेक ,अशोक आईंचवार, तसेच शेकडो गावकरी मंडळी उपस्थित होते .