अमरावती – निरामय व सुदृढ आरोग्यासाठी जिल्ह्यात हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून चळवळ उभी करणारे वस्तू व सेवाकर विभागाचे सेवानिवृत्त ऊप आयुक्त दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रथमच जिल्ह्यातील ८० धावकांनी सातारा येथे झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले.
दिलीप पाटील व पोलीस हेड कॉन्स्टेबल एसीबी अमरावती राजेश वासुदेव कोचे यांनी सेकंड रनरअप तर तब्बल 30 धावांनी सिल्वर मेडल प्राप्त करत अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ राहावे याकरिता अमरावती रोड रनर्स ग्रुपचे सदस्य देशभरात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होतात.
यंदा सातारा येथे झालेल्या 21 किलोमीटर हाफ हिल रन स्पर्धेत जगभरातील धावक सहभागी झाले होते या स्पर्धेत प्रथमच शहरातील तब्बल 80 धावकांनी सहभागी झाले. या स्पर्धेत ६५ ते ६९ वयोगटात दिलीप पाटील तर ४० ते ४५ वयोगटात राजेश कोचे यांनी सेकंड रनरअप होण्याचा बहुमान मिळाला.
देशभरातील पट्टीच्या स्पर्धकांसोबत धावत तीस सदस्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले. एकाच शहरातून एवढ्या मोठ्या संख्येने धावक सहभागी झाल्याने सातारा मॅरेथॉन स्पर्धेत अमरावतीच्या मातीत असलेली खिलाडू वृत्ती नव्याने अधोरेखित झाली. सह्याद्री पर्वताच्या कुशीत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल 11 किलोमीटरचा घाट तर दहा किलोमीटरचा उतारा काही तासांमध्ये पूर्ण केल्याचा थरारक अनुभव अनेकांनी व्यक्त केला.
या स्पर्धेत अभियंता दीपमाला सालुंखे-बद्रे, तहसीलदार संतोष काकडे, प्रग्नेश दोशी, उद्योजक निलेश परतानी, ज्योति परतानी, राधिका दम्मानी, निलेश दम्मानी, निखिल सोनी, अस्मिता सोनी, कल्पेश पिंजानी, रूही पिंजानी, ब्रजेश सादानी, बिल्डर प्रमोद राठोड़, राम छुटलानी, पुलिस उपाधीक्षक सुर्यकांत जगदाळे,
नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक अनिल कुरलकर, डॉ. अतुल कढ़ाने, डॉ गीतांजलि कढ़ाने, डॉ अंजली देशमुख, डॉ सचिन कोरडे डॉ लक्ष्मीकांत खंडागले, डॉ. अमित डाफे, डॉ उषा गजभिये, डॉ. सागर धनोडकर, अतुल कलमकर, संदीप बागड़े, जयंत सोनोने, प्रवीण जयस्वाल, प्रशांत सातव, प्रदीप बद्रे, राजेश कोचे, आशीष आडवानीकर, तन्वी अंबुलकर,
गौरव ढेरे, प्रीतेश सुरंजे, गिरीश राठी, अलका जोशी, सनी वाधवानी, राजू देशमुख, मंगेश पाटिल, अर्चना मांगे, सूरज मडावी, विक्की चौधरी, सनी जगमलानी, स्नेहल चव्हाण, सुनील बम्बाले, नीलेश लांजेवार, प्रफुल्ल गावंडे, मंगेश सगने, गोपाल तरफे, कपिल राठी, विक्की इंगोले, महेश बजाज, प्रणिता पाटिल, सुरज मडावी, संजय अंबाडकर,
अर्चना दुधे, सोनी मोटवानी आदींनी सहभाग नोंदविला. कोट बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये याकरिता आम्ही देशभरातील विविध मॅरेथॉन मध्ये सहभागी होतो. सातारा मॅरेथॉन मध्ये अमरावतीच्या धावकांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.
8 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील धावक अमरावतीच्या हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार असून प्रत्येकानी आपल्या व कुटुंबाच्या सुदृढ आणि निरामय आरोग्यासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. अमरावती शहरातील नागरिकांकरीता निःशुल्क प्रशिक्षण मागील ४ वर्षापासुन चालु आहे.
अमरावती रोड रनर्स या ग्रुपची निर्मीती करून मॅरेथॉन रनींगचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण या ग्रुप मधील सदस्यांना देण्यात ये आहे. ८० धावकांचा सातारा हिल हाफ मॅरेथॉन मध्ये सहभाग हा यांचाच परीपाक होय. – दिलीप पाटील, विक्रीकर ऊप आयुक्त, (से.नि.) मुख्य मार्गदर्शक अमरावती रोड रनर्स ग्रुप