अकोला : काल जालन्यात मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. तर आज अकोल्यातही वंचित बहुजन आघडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
शहरातील यमुना संकुल जवळ रस्तारोको करीत हा आंदोलन पुकारण्यात आला..यावेळी मात्र पोलिसांची तारांबळ उडाली अचानक पुकारलेल्या या आंदोलनात पोलीस पोहचू शकली नाही..वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल ट्विट करून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करून राज्यभर आंदोलन पुकारणार असल्याचं म्हंटल होत..अकोल्यात झालेल्या या आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.यावेळी वंचितने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप मधिल नेत्यांना शन्ड म्हणून उदगारून त्यांचा निषेध केलाय.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे , महासचिव राजकुमार दामोदर, पुर्व महानगर अध्यक्ष जय तायडे,शंकरराव इंगळे, तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, कुणाल राऊत,सचिन शिराळे, दादाराव पवार, आनंद खंडारे, संतोष गवई, श्रीकृष्ण देवकुणबी,ऍड मिनल मेंढे, अमित मोरे, ऍड सुबोध डोंगरे, आदित्य इंगळे, मनोहर बनसोड, विजय शिंदे, आकाश जंजाळ, वैभव खडसे, सुजित तेलगोटे,शेखर इंगळे, साहील आठवले,राज बोदडे, रंजीत तायडे,मनोज इंगळे, शिलवंत शिरसाट, गणेश पाथळकर ,महेश शर्मा, आशिष सरपाते, अमोल सोनोने,आनंद शिरसाट, राहुल अहिर,रामा लाहुडकार,ओम मुरेकर,शिरीष ओव्हाळ, आकाश गवई,अंकुश खाडे, अंकुश वक्ते, अंकित कापसे, साहिल खंडारे, पवन ठाकरे, राहुल काजळे, करण ठाकरे , शुभम खरडे, पवन ताठोड, मण्या खाडे, संजय शेजव, दादु लांडगे, संदीप क्षीरसागर, स्वप्निल अ. वानखडे उपस्थित होते.