सांगली – ज्योती मोरे.
श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता सांगलीतील शिवतीर्थ मारुती चौकापासून ते हरिपूरच्या संगमेश्वर मंदिरापर्यंत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिलीय.
दरम्यान सदर कावड यात्रेचा शुभारंभ तानाजी मालूसरे यांचे बारावे वंशज नितिन मालूसरे याच्या हस्ते होणाराय.जिल्ह्यातील समस्त हिंदू बांधवांनी सदर कावड यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं अवाहन नितीन चौगुले यांनी केले आहे.