Sunday, November 17, 2024
Homeगुन्हेगारीरक्षाबंधनाला जाऊ दिले नाही म्हणून तिने चिमुकलीसह ६ व्या मजल्यावरून मारली उडी...दोघांचाही...

रक्षाबंधनाला जाऊ दिले नाही म्हणून तिने चिमुकलीसह ६ व्या मजल्यावरून मारली उडी…दोघांचाही मृत्यू…

ठाण्यातील कासारवडवली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जॉय स्क्वेअर बिल्डिंग मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. या इमारतीत राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीसह इमारतीच्या ६ व्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केली आहे. या दोघांचे मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

कासारवडवली दिलेल्या माहितीनुसार, कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोडबंदर रोड येथील जॉय स्क्वेअर बिल्डिंगमध्ये राहणारी 28 वर्षीय प्रियंका मोहिते आणि तिच्या एक वर्षाच्या मुलगी धृवीला घेवून घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहिती नुसार, तिला सातारा येथे आपल्या भावाच्या घरी रक्षाबंधनाला जाऊ न दिल्याने 28 वर्षीय महिलेने आत्म्हत्येच कठोर पाउल उचलले आहे. तिची लहान मुलगी ध्रुवी फक्त 1 वर्षाची होती. सदर घटना रात्री १ वाजताच्या च्या सुमारास घडली.

सदर प्रकरणी कासारवडवली पोलिस स्टेशन अपघाती मृत्यू रजिस्टर क्रमांक 97/23 व 98/23 सी आर पी सी 174 प्रमाणे नोंद करण्यात आला असून प्राथमिक तपास स पो नि हट्टेकर करीत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: