रामटेक – राजु कापसे
रेशीम बंध या उपक्रमा अंतर्गत आज स्नेह सदन मतीमंद मुला-मुलींची विशेष अनिवासी/ निवासी शाळा, शितलवाडी ता. रामटेक येथे मातृका फाउंडेशन, रामटेक, सक्षम, रामटेक (विकालांगो के हेतू समर्पित राष्ट्रीय संगठन)श्रुष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था, रामटेक च्या वतीने रक्षाबंध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
यावेळी रामटेक येथील प्रतिष्ठीत औषधी व्यावसायिक तथा अध्यक्ष, रामटेक श्री. हृषीकेश किमंतकर यांचे जेष्ठ पुत्र चि. प्रथमेश यांचा जन्मदिन असल्याने दिव्यांग मुलांना राखी बांधल्यानंतर खाऊ, धान्य व क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मातृका फाउंडेशन, रामटेक च्या मा. माकडे मैडम, डॉ. अंशुजा किमंतकर मैडम व सक्षम, रामटेक (विकालांगो के हेतू समर्पित राष्ट्रीय संगठन) च्या डॉ. अंशुजा किमंतकर मैडम , श्री. पंकज पांडे, श्रुष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था,
रामटेक चे श्री. हृषीकेश किमंतकर , श्री. भूषण देशमुख, श्री. लोकेश भुरे, श्री. हेमंत रेवस्कर डॉ .बापू सेलोकर, श्री. वेदप्रकाश मोकद्दम, दुशांत कारेमोरे, श्री. सचिन झाडे, श्री हर्ष कनोजेसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. सक्षम द्वारा गर्जाधिष्ट व्यक्तींना आवश्यक ती मदत करण्यात येईल उपस्थित सर्व मान्यवर मोठे व्यापारी आहात आपल्या माध्यमात थोडं छोटे- मोठे दिव्यांग मुले करू शकेल असे कामे राहिल्यास मला कळवावे जेणे करून कामाची आवश्यक्ता असलेल्या दिव्यांगाना रोजगार देऊन सक्षम करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. आ. किमंतकर मैडम यांनी नियमित दरवर्षी असाच आगळावेगळा उपक्रम आपण राबत राहु असे आश्वासन दिले व शक्य ती मदत दिव्यांगाना करू असे मत व्यक्त केले.
चि.प्रथमेश यांनी मतिमंद मुलांच्या विविध समस्या व म्हणात उत्पन्न झालेल्या समस्यावर चर्चा व मत व्यक्त केले. आदरणीय ऋषीकेश किमंतकर दादा राखी च्या शुभेच्या देत मार्गदर्शन केले. शाळेतील दिव्यांग मुलीनी सर्व पाहुण्यांना राखी बांधली . यावेळी शाळेच्या वतीने दिव्यांगाच्या विविध कामाबाबत माहिती शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे यांनी दिली. व शाळेत एवढा छान रेशीम बंध उपक्रम राबविल्याबद्दल व मुलांचा उत्साह द्विगुणीत केल्याबद्दल संस्थांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील सर्व मुले शिक्षक व कर्मचारीसह ईतर पधाधिकारी उपस्थित होते.शेवटी दिव्यांच्या शिक्षणासाठी मदत मिळावी अशी अपेक्षा शाळेच्या वतिने मांडण्यात आली.