मुंबई येथे उद्या ३१ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी इंडिया (INDIA) आघाडाची बैठक होणार आहे. मात्र देशाच्या राजकीय विरोधी पक्षांनी स्थापित केलेल्या इंडियाच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नसल्याचं वंचित बहुजनने स्पष्ट केलं आहेय. तर अनेक माध्यमांद्वारे वंचित या बैठकीकडे पाठफिरवणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेय, यावर वंचितने नाराजी व्यक्त करीत आपली भूमिका स्पष्ट केली आहेय…
वंचित बहुजन आघाडीला INDIA अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण नसल्यामुळे बैठकीत सहभागी होऊ शकत नाही अस स्पष्ट केलं आहेय…मात्र तरीसुद्धा काही माध्यमे सतत संभ्रम निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहेय.
वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात खोट्या बातम्या देणं तात्काळ बंद करण्याचा इशारा वंचितने दिलाय…लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी जी वस्तुस्थिती आहे त्या संदर्भात बातम्या देण्याची विनंती वंचितच्यावतीने करण्यात आली आहेय..मात्र इंडिया तर्फे निमंत्रण मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी या बैठकीत नक्की सामील होणार असल्याचं वंचितने जाहीर केलं आहेय..