रामटेक – राजू कापसे
दिनांक २३/०८/२०२३ ला मनसे जिल्हाध्यक्ष शेखरभाऊ दुन्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व पारशिवनी तालुका अध्यक्ष डॅनी धानोरे यांच्या नेतृत्वात रामटेक बस स्टॉप आगार प्रमुख यांना पारशिवनी वरील बस समस्या बद्दल निवेदन देण्यात आले, तसेच रामटेक बस स्टॉप वर असलेल्या बसेसचा तुटवडा व नागरिकांची होत असलेली गैरसोय याबद्दल आगार प्रमुखांशी चर्चा करण्यात आली व पारशिवनीची बस समस्या येत्या १५ दिवसात सोडवली नाही तर भव्य आंदोलन करण्यात येईल असे आगार प्रमुखाला पारशिवनी तालुका अध्यक्ष डॅनी धानोरे यांच्याद्वारे ठामपणे सांगण्यात आले.
यावेळी रामटेक विधानसभा सचिव सुरज दुन्डे, रामटेक तालुका संघटक मनोज पालीवार, रामटेक तालुका उपाध्यक्ष बजरंग काटोले, रामटेक तालुका उपाध्यक्ष विनायक महाजन, रामटेक शहर अध्यक्ष सागर चांदेकर, रामटेक शहर संघटक व वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष शारीक पठान, रामटेक विभाग अध्यक्ष प्रफुल सहारे, विभाग अध्यक्ष मनीष खडसे, पथरई ग्रामपंचायत सदस्य कुंदन राऊत,मनसर विभाग अध्यक्ष संदीप भालेराव व अन्य मनसे सैनिक व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.