Sunday, November 17, 2024
Homeराज्यनैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव नसल्याने लाखपुरी व लाखपुरी सर्कल...

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव नसल्याने लाखपुरी व लाखपुरी सर्कल मधील शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना नाव समाविष्ट करण्यासाठी निवेदन…

लाखपुरी – मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन कडुन २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे . त्या करिता शासनाकडुन आधार प्रमाणीकरण (e-KYC) सहज व सोपे होण्यासाठी सेतु मध्ये केवायसी करण्याकरिता प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नाव असल्यास कागदपत्रे घेवून सेतु व आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) मध्ये जावून प्रमाणीकरण (e-KYC)करून घेता येते.

सदर याद्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्यात आल्या आहे. तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील लाखपुरी , दातवी , लाईत , खुदावंतपुर , रसलपुर , रेपाटखेड , मंगरुळकाबे , जांभा ,दुर्गवाडा , सांगवी वाघझडी सह लाखपुरी सर्कल मधील खुप मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नाव आधार प्रमाणीकर यादीत नाहीत.

त्या शेतक-याचे नाव सदर यादीत समाविष्ट करणे साठी आज दि. २३-०८-२०२३ ला उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर व तहसीलदार मुर्तीजापुर यांना लाखपुरी व लाखपुरी सर्कल च्या शेतकऱ्यां कडून निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात शेतकऱ्याचे म्हणणे आहे की ज्या शेतक-यांचे नाव नाहीत त्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट करण्यात यावे व यामध्ये जर कुणाच्या हलगर्जीपणामुळे शेतक-यांचे नाव आले नसेल तर त्या संबधितावर कारवाई करावी व सदर निवेदनाची दखल ८ दिवसात निकाली न निघल्यास लाखपुरी येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाछा इशारा या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन पि एल . सिरसाट प्रणीत ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल नवघरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी लाखपुरी सर्कल मधील निरंजन चव्हाण , प्रकाश राजपुत , शे. रहिम , अनिलसिंह चौहान , महादेव नवघरे , संदिप इंगळे ,रोशन वानखडे , अमिता इंगळे , सतिषसिंह चौहाण , मिरा चौहाण , देविदास वानखडे , अजय तायडे ग्रा.प. सदस्य सह शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते.

लाखपुरी व लाखपुरी सर्कल मधील सन २०२२ मधील नैसर्गिक आपत्ती मदती यादी आली आहे . परन्तु त्या यादी मध्ये बहुतांश शेतकऱ्याचे अजुनही नाव नाहीत तरी लाखपुरी सर्कल मधील ज्या शेतकऱ्याचे नाव नाहीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात यावे . सौ. मिनल चं.‌नवघरे (माजी. पंचायत समिती सदस्य लाखपूरी

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: