सांगली – ज्योती मोरे
सांगली – “ईशान्येकडील सात राज्यांचा विकास झाल्याशिवाय भारताचा विकास अपूर्ण आहे. त्यासाठी या दुर्गम भागात प्रथम दळण वळणाची साधने उपलब्ध करून तेथील नागरिकांना उर्वरित देशात येण्या जाण्याची सोय करून दिली पाहिजे. ईशान्य भारतात अलगतेची भावना कमी करण्यासाठी रस्ते बांधणी हे महत्वाचे पाऊल आहे.
अशी स्व. अटलजी यांची भावना होती. त्यांच्या पंतप्रधान काळात या दृष्टीने सुरुवात हि झाली होती. अटलजींचे हे स्वप्न पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींजी पूर्ण करीत असून रस्ते विकास, विमानतळ अश्या पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. श्रद्धेय अटलजींच्या स्वप्नांना मोदिजी प्रत्यक्षात आणत आहेत.
आणि हीच स्व. अटलजी यांना खरी आदरांजली आहे. असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी अटलजी यांच्या पुण्यतिथी निमित्त व्यक्त केले. स्वर्गीय अटलजींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आमदार सुधीर गाडगीळ बोलत होते.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, श्रीकांत तात्या शिंदे, अशरफ वांकर, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, अविनाश मोहिते, चेतन माडगुळकर, प्रथमेश वैद्य, निलेश निकम, प्रवीण कुलकर्णी, गणपती साळुंखे, मोहनबापू जाधव, सारंग साळुंखे, अनिकेत खिलारे, श्रीधर जाधव, आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.