रामटेक – निशांत गवई
जनप्रभा इंटरनॅशनल व जनप्रभा कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्या जागर फाउंडेशन चे संचालक रोहन जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
जनप्रभा इंटरनॅशनल तसेच जनप्रभा कॉलेजचे प्राचार्य सत्यजित खटाळ, उपप्राचार्य लहु झुरे शाळेचे व कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा आगमना बरोबरच कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच लेझीम चे उत्तम सादरीकरण केले विद्यार्थ्यांनी आपल्या देशभक्तीने ओथंबलेल्या भावना त्यांच्या भाषणातून उत्स्फूर्तपणे सादर केल्या.
रोहन जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व काय असते याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जनप्रभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशाच्या युवक हा सक्षम असावा विचाराने परिपक्व भविष्याचा वेध घेणारा असावा तो देशाचा कणा आहे त्यांनी जेष्ठ व्यक्तीचे तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य दिशेने आपल्या कोणत्याही कार्याची वाटचाल करावी व यशाची नवनवीन शिखरे काबीज करावी असे आवाहन त्यांनी नवयुवकांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झलकता महाजन यांनी केले तसेच प्रास्ताविक सुनीता शेंडे यांनी केले आभार प्रदर्शन किरण वाडीभस्मे यांनी केले. उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.