विद्यार्थीच्या शिक्षणा चा खेळखंडोबा…
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील ग्राम कोसगाव हे आदिवासी बहुल गाव असून येथील जिल्हा परिषद शाळेचि १९४९ साली स्थापना करण्यात आली असून आज शिक्षणला काळिमा फासल्या गेल्या सारखीच घटना आज घडली. दिलेल्या तक्रारीनुसार दिनेशकुमार मालानी मुंडे हे जी प शाळा कोसगाव हे नेहमी मद्यधुंद अवस्थेत असून याचा शाळेतील विद्यार्थ्यांना वाईट परिणाम होताना दिसून येतात परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येत आहे.
शिक्षक दिनेशकुमार बालाजी मुंडे हे सहायक शिक्षक पदावर जी प पा शाळा कोसगांव येथे कार्यरत आहेत. ते शिक्षक शाळेत अनेक वेळा अर्ज न देता गैरहजर असतात. शिकवण्याचे काम ही करत नाही. वारंवार महिती न देता शाळेवर गैरहजर असतात इथे आल्यापासून प्रत्येक महिन्यात १०-१५ दिवस शाळेत गैरहजर असतात, व ते दारु पीऊन त्यांना चालण्या बोलण्याचीही धुंद नसते, याबाबतीत पंचायत समितीत अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. व ते सध्या आता पासून शाळेवर गैरहजर आहेत.
अशा दारू पिणाऱ्या नेहमी गैरहजर रहाणाऱ्या शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत लेखी तक्रार दिली असुन त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात यावी त्यांना आमच्या गावातील शाळेत पाठवु नये. त्यांच्या जागी नविन शिक्षक देण्यात यावा व आमच्या मुलाचे भविष्य खराब होण्यापासून वाचवावे.अशी आर्त हाक गावकऱ्यांनी दिली आहे.
सदर चि वार्ता शहरातील दोन पत्रकार निशांत गवई व दुले खान यांना मिळताच कोसगाव येथे जाऊन घटनेची शहाणीशा केली असता घटनास्थळ वरून या गंभीर बाबी चि कल्पना वंचित बहुजन आघाडी चे उपसभापती इम्रान खान यांना देताच तात्काळ दखल घेऊन गट शिक्षणाधिकारी दिपमाला भटकर, सभापती सौ. सविता अर्जुन टप्पे यांना घेऊन कोसगाव येथे येऊन पाहणी करून शिक्षक दिनेशकुमार मुंडे यांना प्राथमिक तपासणी करिता पातूर येथील प्रा. आ. केंद्रात आणले होते
सदर शिक्षक च्या तक्रारी अनेकदा मिळाल्या होत्या अनेक वेळा समज देऊन सुद्धा त्यात सुधारणा झाली नाही आज सुद्धा तक्रार आली असता शहाणीशा करून शिक्षक मुंडे यांना आज तपासणी करिता प्रा. आ. केंद्रात आणले असून अहवाल प्राप्त होताच योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
दिपमाला भटकर गटशिक्षणाधिकारी सदर चि बाब हि गंभीर असून विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान होणार असेल तर हि बाब खपवून गेल्या जाणार नाही शिक्षक मुंडे वर योग्य ति कारवाई करू सौ. सविता अर्जुन टप्पे सभापती. आदिवासी बहुल भागात अशी घटना म्हणजे दुःख दायक असून मदयापी शिक्षक यांनी शैक्षणिक वेळेत असे कार्य करू नये समाजात शिक्षका चा मान खूप असून अशा घटनामुळे मन हेलावून जाते इम्रान खान उपसभापती