Friday, October 18, 2024
Homeराजकीयभारतीय जनता पार्टीचे शहर जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम...प्रकाश...

भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम…प्रकाश ढंग

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

आम.सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाच्या नियोजनाची महत्त्वाची बैठक भा ज पा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सांगली विधानसभेचे आम. मा.सुधीर दादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

यावेळी बोलताना मा.सुधीर दादा गाडगीळ म्हणाले, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना संपूर्ण देशाचा कायापालट होत आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात मोदीजींनी देश भावना जागृत केली आहे.भाजपा प्रदेशाकडून आलेले 15 ऑगस्ट चे सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडूया.

या वेळी बोलताना भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे म्हणाले,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी दि.9 ते 15 ऑगस्ट 2023 साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेमध्ये हे कार्यक्रम तीन टप्प्यात पार पडणार असून दि.9 ते 11 ऑगस्ट रोजी प्रत्येक विधानसभा क्षेत्र मेरी मिट्टी मेरा देश,हुतात्मा स्मारक स्थळांचे भेट व पूजन, हुतात्माच्या कुटुंबियांशी संपर्क, हर घर तिरंगा अभियान, आयोजन करण्यात आले आहे.
दुसरा टप्प्यात दि. 11ते 14 ऑगस्ट 2023 हर घर तिरंगा लावणे, भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नवीन मतदार नोंदणी, 75 ठिकाणी वृक्षारोपण, देशभक्तीपर गाण्याची कार्यक्रम, 14 ऑगस्ट विस्थापित दिनानिमित्त विस्थापतशी सुसंवाद, चर्चासत्र, प्रदर्शन, या कार्यक्रमाचे नियोजन करावे. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण, सामूहिक राष्ट्रगीत गायन असे विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यात भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी ही सहभागी व्हावे असे आव्हान या बैठकीत केले. माजी आम. दिनकर तात्या म्हणाले, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षाच्या कालावधीत देशाला विकासाच्या, प्रगतीच्या दिशेने.ने ऊन जगामध्ये भारताची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. भारतीय नागरिकांच्या मनात देशाबद्दल प्रचंड अभिमान निर्माण केला आहे. या तिरंगा कार्यक्रमांमध्ये मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.

जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले, भाजपा प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या या तिरंगा कार्यक्रमाचे सांगली शहर जिल्ह्यातील तिन्ही शहरात चांगल्या प्रकारे आम्ही नियोजन केले असून या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या मनात देशभक्तीची प्रेरणा वाढीस मदत होईल.
या कार्यक्रमाचे स्वागत अविनाश मोहिते यांनी केले व भारतीताई दिगडे यांनी आभार मानले.

या बैठकीत आम. मा.सुधीरदादा गाडगीळ,मा.शेखरजी इनामदार,माजी आम.दिनकर तात्या पाटील,मा.अमरसिंह देशमुख,मोहनराव वनखंडे ,माजी महापौर सौ संगीताताई खोत, सभापती धीरज सूर्यवंशी, नगरसेवक युवराज बावडेकर, सुब्राव तात्या मद्रासी, सौ उर्मिला ताई बेलवलकर, सविता मदने, अजिंक्य पाटील, पांडुरंग कोरे, कल्पनाताई कोळेकर,राजेंद्र कुंभार,संजय कुलकर्णी, दीपक माने, मुन्नाभाई कुरणे,शहानवाज सौदागर, बाबासाहेब आळतेकर, जय गोंड कोरे, ज्योती कांबळे, जयवंत पाटील, विनायक शिंदे,सुजित राऊत, रवींद्र ढगे, दरिबा बंडगर, गौस पठाण,उदय मुळे,रोहित जगदाळे,शितल कर्वे, हेमलता मोरे,माधुरी वसगडे,स्मिता पवार,मोहन जामदार, गणपतराव साळुंखे, मकरंद कुलकर्णी,आदी मान्यवरांचे उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीस मोठ्या संख्येने नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: