Sunday, December 22, 2024
Homeराज्यमोवाड बसस्थानक दर्ग्यातील दानपेटीवर मारला चोरट्यानी डल्ला...

मोवाड बसस्थानक दर्ग्यातील दानपेटीवर मारला चोरट्यानी डल्ला…

हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी, पोलीसांनाच्या नाकावर टिचुन चोरी

नरखेड – अतुल दंढारे

राममंदिराच्या चोरीच्या माध्यमातून मधात आलेली अडसर महिला हिचा खून करण्यात आलेला चोरट्याना पकडून पोलिसांना मात्र मोठे यश आले असले तरी मात्र चोरट्याचा थाम थांबला नाही.पंधरा दिवसाने ही चोरट्याची दुसरी घटना घडली.

दि. 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या दरम्यान मोवाड बस स्थानक परिसरातील असलेला पहिलवान शहा बाबा दरबार मधील दानपेटी चोरट्यानी तोडून त्यामधील दान स्वरूपात आलेली रक्कम अंदाजे 14 ते 15 हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले.

प्रेम खडसे राहणार मोवाड यांच्या तोंडी रिपोर्ट वरून मोवाड पोलीस चौकी येथे कलम 379 भा.द. वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास मोवाड पोलीस चौकीचे इन्चार्ज प्रेमराज सनेचर, पोलीस शिपाई गणेश ताजने, करित आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: