पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य मंगेश इंगळे यांनी पत्नीच्या नावाने अकोला येथे फ्लॅट ची खरेदी करून त्या फ्लॅट ची नोंद करण्यासाठी तहसीलदार व लिपिक यांनी आर्थिक मागणी केली होती.
परंतु ६ ते७ महिने उलटून सुद्धा संबधित अधिकारी व लिपिक यांच्यावर कारवाई न केल्याने मुबंई मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा गृहमंत्री यांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
दिलेल्या तक्रारीत अकोला तहसील चे तहसीलदार सुनील पाटील यांच्या सांगण्यावरून लिपिक यांना २ हजार बाकी तहसीलदार यांना ८ हजार असे एकूण १० हजार रुपये लाचेची पंचसमक्ष मागणी केली आहे.यामध्ये दोघेही आरोपी होते.
परंतु अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती आयच्याकडून जाणीवपूर्वक ११ जानेवारी २०२३ पासून पाच महिने उलटूनही कारवाई करण्यास विलंब केला. म्हणून मंगेश इंगळे यांनी अप्पर पोलीस महासंचालक लाचलुचपत विभाग मुबंई यांच्याकडे वारंवार अनेक तक्रारी केल्या परंतु कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे विश्वास नागरे यांना प्रत्यक्ष माहिती देऊन तहसीलदार व लिपिक यांच्यावर करवाई करण्यास विनंती केली.त्यानुसार संबंधित विभागाला सुद्धा कारवाई करण्यास आदेशीत करण्यात आले आहे.
परंतु येथील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी दोन्ही आरोपी यांच्यावर कारवाईस विलंब व मुख्य आरोपी लाच घेणार तहसीलदार यांच्यावर अजून सुद्धा कारवाई न केल्याने टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारीत नमूद केला असून यांच्यावर तत्काळ कारवाई न केल्यास मला योग्य न्याय न मिळाल्यास मंगेश प्रितम इंगळे हे मुबंई मंत्रालय मध्ये २८ आगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे.