Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingगेंडा जंगल सोडून चक्क रस्त्याने फिरतोय...व्हायरल व्हिडीओ...

गेंडा जंगल सोडून चक्क रस्त्याने फिरतोय…व्हायरल व्हिडीओ…

न्युज डेस्क – गेंडा जंगल सोडून शहराच्या रस्त्याने कधी पहिला काय?…वाहने आणि दुचाकींव्यतिरिक्त रस्त्यावर गुरे दिसणे सर्रास दिसून येते. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून जनता हैराण झाली आहे. वास्तविक, ही क्लिप शेजारच्या नेपाळमधील आहे, ज्यामध्ये एक गेंडा रस्त्यावर निष्काळजीपणे चालताना दिसत आहे.

मात्र, गेंड्याच्या उपस्थितीमुळे कोणीही घाबरत नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लोक आणि वाहने सुसाट जात आहेत आणि गेंडा सरळ चालत जात आहे. हा व्हिडीओ कधी शूट करण्यात आला याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

या व्हायरल क्लिपमध्ये एक गेंडा दिसत आहे. तो मुख्य रस्त्यावर आनंदाने चालत पुढे जात आहे. यादरम्यान वाहने, दुचाकी आदी रस्त्यावरून बाहेर पडत आहेत. गेंड्याला पाहून वाटसरू घाबरत नसून त्याच्या जवळ उभे राहून व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. विशेष म्हणजे गेंडा कोणाला काहीही करता शांतपणे आपल्या मार्गाने निघून जातो.

30 जुलै रोजी @gunsnrosesgirl3 ने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता – नेपाळमधील मुख्य रस्त्यावर चालताना गेंडा दिसला…

एका व्यक्तीने विचारले – नेपाळमध्ये गेंडा काय करतो? दुसर्‍याने लिहिले – काय अद्भुत प्राणी आहे.ही क्लिप मूळतः @pubity नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली होती, जी आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: