Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsजयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार...आरपीएफच्या एएसआयसह चौघांचा मृत्यू...

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार…आरपीएफच्या एएसआयसह चौघांचा मृत्यू…

जयपूर मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या गोळीबारात चार जण जागेवरच ठार झाले आहेत. ही घटना पालघरमधील आहे. आरपीएफ जवानाने गोळी झाडली आणि मृतांमध्ये आरपीएफ एएसआय आणि एका प्रवाशाचा समावेश आहे. आरोपी आरपीएफ जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या ट्रेनमध्ये गोळीबार झाला ती ट्रेन गुजरातहून मुंबईला जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर चालत्या जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केला. त्याने एक आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. आरोपी कॉन्स्टेबलला त्याच्या शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.

ज्या डब्यात ही घटना घडली, तो डबा पोलिसांकडून सिल करण्यात आला आहे. पोलीस सर्व तपास करत आहेत. गोळीबार का केला, याबाबत तपासाअंतीच स्पष्ट होईल. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजरमध्ये अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांना उतरवत तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: