नांदेड – महेंद्र गायकवाड
किनवट तालुक्यातील आदिवासी ग्रामीण दुर्गम भागात मागील 60 वर्षापासून बोधडी अंध विद्यालयात हे अंध विध्यार्थ्यांना शिक्षण देत असून त्याच बरोबर संगीत शिक्षणासाठी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या संस्थेशी अंध विद्यालय बोधडी सलग्न आहे.
कै. पं. वसंत शिरभाते गुरुजी व तत्कालीन प्राचार्य कै.भीमराव टारपे यांच्या अथक परिश्रमातून सन 1982 पासून आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबईचे संगीत केंद्र चालू आहे, मागील 40 वर्षापासून केंद्रा मार्फत आज पर्यंत शेकोडो अंध आणि डोळस मुलांनी संगीताचे शिक्षण घेऊन रोजगार मिळावीला आहे.
सध्या कार्यरत असलेले संगीत शिक्षक राजेश ठाकरे गुरुजी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून मागील अनेक वर्षापासून आदिवासी ग्रामीण भागातील अंध व डोळस विध्यार्थ्यांना प्रारंभीक ते विशारद पर्यंतचे शिक्षण देत आहेत,सदरील केंद्रत जास्तीतजास्त आदिवासी,अंध दिव्यांग, डोळस विदयार्थ्यांना सहभाग नोंदवून मुलांना संगीत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत,
त्यांच्या मेहनत व जिद्दी मुळेच आज आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुबंईने देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेनी दखल घेऊन महाराष्ट्रातून बोधडी अंध विद्यालय केंद्राला दिनांक 28 ऑगस्ट रोजी मुबई येथे कार्यक्रमात ” आदर्श केंद्र व्यवस्थापक पुरस्कार “देऊन गौरव केला. अंध विद्यालयाला पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वत्र संस्थेचे कौतुक होत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश टारपे व सचिव प्रकाश टारपे यांनी संगीत शिक्षक राजेश ठाकरे गुरुजी व प्राचार्य व्ही. के. कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.