रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुका अंतर्गत मौजा बोथीया-पालोरा येथे दिनांक २८ जुलै ला रोज शुक्रवार ला माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे राजेंद्र मुळक यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षापासून राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून गावातील गरजू लोकांना जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या करीता,
मौजा बोथीया-पालोरा येथे मोफत वैद्यकीय तपासणी, डोळे तपासणी तथा चष्मा वाटप, आधार अपडेट, राशन कार्ड,निराधार योजना नोंदणी, ई श्रम कार्ड,इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड व आयुष्यमान कार्ड इत्यादी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यात आले.
यावेळी श्रीमती. शांताताई कुमरे जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके ,जि.प.सदस्या शांताताई कुमरे,सरपंच डॉ.सुधीर नाखले ,श्री.परमेश्वर इनवाते , सुनीताताई निचंते, विनोद वासनिक, नरेंद्र वाडके, मुकेश तिवारी, मनीष मडावी, मनोज पंधराम चेतराम परतेती, श्रीराम मेश्राम आनंदराव कुमरे इत्यादी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.