Viral Video : सोशल मीडियावर कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. मोबाईल आता प्रत्येकाच्या हाती आल्याने त्याला कोणत्याही प्रकार टिपणे सहज झाले झाले आहे. गावखेड्यातील विशिष्ट प्रकारही मोबाईल मुले आपल्या पर्यंत येतात. तर काही भन्नाट असतात ज्याने आपण पोट धरुन हसायला लावतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्रा म्हशीवर स्वार होताना दिसत आहे. कुत्रा अगदी फुल और काटे मधील अजय देवगण सारखा ऐटीत उभा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
सध्या जो व्हिडिओ वायरल होत आहे, तो 𝐒𝐡𝐚𝐳𝐢𝐲𝐚 𝐂𝐡𝐚𝐮𝐝𝐡𝐚𝐫𝐲 यांनी आपल्या Twitter वरून शेयर केला आहे आणि कॅप्शन लिहले…’हर कुत्ते का दिन आता है ये सुना था आज देख भी लिया’…यामध्ये राजाप्रमाणे एक कुत्रा गावभर ऐटीत फिरत आहे. हा कुत्रा नुसता राजासारखा फिरत नाही तर तो म्हैस राइड करत आहे. राजेशाही रुबाबात म्हैशीच्या पाठीवर स्वार होऊन हा कुत्रा अगदी रुबाबात गावभर फिरत आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत कुत्रा म्हशीवर उभा असल्याचे दिसत आहे. दोन म्हशी रस्त्यावरुन चालल्या आहेत आणि एका म्हशीच्या अंगावर कुत्रा उभा राहिला आहे. हा व्हिडिओ खूप जुना असून,अजूनही तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून, नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया देत आहे.