शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
मुंबई – गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने पडणाऱ्या पावसाने ठाणे जिल्ह्यास राज्यात ठिकठिकाणी जोरदार हजेरी लावलीय.. यातच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुकयातील महत्वाचे मानलं जाणारे तानसा धरण आज पहाटे 4:35 मि. ओव्हर फ्लो झाले आहे.
धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे… परिणामी तानसा नदी काठ च्या गावांना धोक्याचा इशारा देणयात आलेला आहे… त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. असं असलं तरी मुंबईकरांची पाण्याची चिंता दूर झाली आणि मुंबई करांसाठी एक आनंदाची बातमी आहे असंच म्हणावं लागेल..