रामटेक – राजू कापसे
बाल संगोपन योजने अंतर्गत शेकडो अनाथ मुलांना महीण्याचा आर्थिक लाभ करवुन देण्यासाठी गट ग्रामपंचायत मानापुर चे सरपंच संदीप सावरकर यांनी पुढाकार घेत त्यांना जिल्ह्यातील संबंधीत मुख्य कार्यालयात नेऊन नोंदनी करून दिली.
दरम्यान सरपंच सावरकर यांनी गट ग्रामपंचायत मानापुर अंतर्गत येत असलेल्या भोजापुर व मानापुर येथील मुलांना व त्यांच्या पालकांना महिला व बाल विकास विभाग नागपूर येथे नेऊन त्यांना महीन्याचा लाभ करून देन्याचे काम केले. यावेळी राहुल वांढरे (ग्रा.प . सदस्य मानापूर ) तथा ईश्वर सनेश्वर या सर्वांनी सुद्धा शर्तीचे प्रयत्न केले.
दरम्यान सोहम व सुजल इंगळे व श्रवानी, अंशू चांदेकर, भावना मेंघरे, अभिजित सावरकर, समीक्षा रोहणकर, भावेश व श्रावणी सावरकर आदींचे फार्म भरण्यात आले. यावेळी सर्वांनी सरपंच संदीप सावरकर यांचेसह राहुल वांढरे व इश्वर सनेश्वर यांचे आभार व्यक्त केले.