रामटेक – राजू कापसे
आकाशझेप फाऊंडेशन रामटेकचे संस्थापक सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांच्या सुवर्ण महोत्सवी (५० वर्षपूर्ती) वाढदिवसानिमित्त २० जुलैला आकाशझेप फाऊंडेशन रामटेक तर्फे भैयाजी ढाबा आमडी (फाटा) अभिष्टचिंतन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे व आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार, प्रमुख पाहुणे डॉ. प्रदीप बोरकर, ॲड .प्रकाश रामटेके, पत्रकार गोपाल कडू, डॉ. इरफान अहमद, चेतन मेश्राम, सचिन किरपान (सभापती,कृ.उ.बा.स. रामटेक), गजाननराव गिरोलकर, महादेव सरभाऊ, सुभाष चव्हाण, ऋषिकेश किंमतकर यांनी बोलताना साक्षोधन कडबे यांच्या द्वारा निःस्वार्थ वृत्तीने केले जात असलेल्या लोकसेवेच्या सामाजिक कार्याबद्दल अभिमान व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मानव एकता मंच, पत्रकार संघ रामटेक-पारशिवनी, अनाज इंडिया, कृषी भारत, ब्लड फॉर बाबासाहेब, रीआन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सृष्टी सौंदर्य बहु.संस्था, परिवर्तन मंच, मनाम एकता मंच, आम्ही भारतीय कृषी समूह किरणापूर अशा अनेक संघटना आणि उपस्थित शेकडो चाहत्यांनी साक्षोधन कडबे व अर्चना कडबे यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा प्रदान केल्या.
यावेळी मंचावर संचालक शैलेश वाढई, रुस्तम मोटघरे, प्रा. राजेंद्र कांबळे, डॉ. बापू सेलोकर, नितीन भैसारे, कवी नामदेव राठोड, रमाकांत मुरमुरे, प्रवीण कांबळे, प्रीतम मेश्राम, आतिश मेश्राम, मिलन पाटील, अफरोज खान, अज्जू पठाण, बबलू शेख, पत्रकार जगदीश सांगोडे, अविनाश शेंडे, राजू कापसे, पंकज बावनकर, आनंद पाटील, विकास गणवीर शेषराव कुथे, सुरेश कुथे, अनील चकोले हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोषाध्यक्ष दिलीप पवार यांनी केले. सहसचिव प्रा. ताराचंद चव्हाण यांनी केले तर संचालक वैभव तुरक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज माकोडे, अनुराग गजभिये, सुमेध गजभिये, नंदकिशोर कुंभरे आणि समस्त सदस्यांनी परिश्रम घेतले.