मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा , भगोरा, धानोरा वैद्य, सोनोरी , शेलूवेताळ- शेरवाडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी व अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून पूर्ण शेतजमीन खरडून गेली व शेतातील संपूर्ण सोयाबीन व तुर पीक नष्ट झाले.
दिनांक १८/०७/२०२३ रात्रीला ढगफुटी होऊन लगातार ६ तास पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनभोरा शिवारातील शेतच्या शेत माती सहित वाहून गेले. तसेच सर्व शेतांचे बांध पूर्णपणे फुटले व शेती खरडून गेली. चांगली निघालेली पिके पूर्णपणे उद्धवस्थ होऊन आज रोजी पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
याकरिता पिक नुकसान भरपाई व पीकविमा मिळण्यात यावा तसेच त्वरित पंचनामा करून शासनाने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरसकट देण्यात यावी. अशी मागणी आमदार हरिष भाऊ पिंपळे मुर्तिजापूर, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी शंकर किरवे साहेब अकोला,
उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर, तहसीलदार बोबडे मॅडम मुर्तिजापूर ,तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, मुर्तिजापूर पटवारी रमेश वाघमोडे, कृषी सेवक तात्यासो गडदे यांना अनभोरा व पंचक्रोशीतील शेकडो शेतकर्यांनी निवेदन देवून मागणी करण्यात आली अशी माहिती स्वप्निल गणेशपुरे यांनी दिली.