Video Viral : राजधानी दिल्लीतील द्वारका परिसरात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. द्वारकाच्या बागडोला गावात पायलट दाम्पत्याने घरगुती मोलकरीण म्हणून कामावर ठेवलेल्या १० वर्षांच्या निष्पाप मुलीवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. छोट्या छोट्या चुकांवर ते मारहाण करायचे एवढच नाहीतर इस्त्री गरम करून चटके दिले व डोळ्यात लाटणे घालून तिच्यावर हल्ला करण्यात आला. बुधवारी निरपराधांच्या नातेवाइकांना या क्रूरतेची माहिती मिळाली. जमावासह आरोपीच्या घरी पोहोचलेल्या कुटुंबीयांनी दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरुद्ध द्वारका दक्षिण पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
कौशिक बागची (३६) आणि त्यांची पत्नी पूर्णिमा बागची (३३) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी सकाळी ९.०० वाजता द्वारका दक्षिण पोलीस स्टेशन सेक्टर-८, डी-ब्लॉक, बागडोला येथून पोलिसांना फोन आला. पायलट दाम्पत्याने 10 वर्षांच्या निष्पाप घरगुती मोलकरीणसोबत क्रूर कृत्य केल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.
तो पर्यंत उपस्थित जमाव आरोपी दाम्पत्याला मारहाण करत होता. पोलिसांनी दोघांचीही जमावाच्या तावडीतून सुटका केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुलीच्या मावशीने सांगितले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिने आपल्या भाचीला पायलट दाम्पत्याच्या घरी कामावर ठेवले. मुलगी पायलट दाम्पत्याच्या अडीच वर्षाच्या चिमुरडीचा सांभाळ करायची. तिला या जोडप्यासोबत त्यांच्या फ्लॅटमध्ये 24 तास राहावे लागायचे.
पोलिसांना दिलेल्या जबानीत मुलीने सांगितले की, घराची साफसफाई, भांडी धुणे याशिवाय कपडे धुणे आणि कपड्यांवर प्रेस करणे ही कामे करायची. थोड्याशा चुकीवर तिला प्रेसचे चटके द्यायचे व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करायचे.
एवढेच नाही तर महिला पायलट तिच्या डोळ्यात बेलन घालायची. मुलीच्या दोन्ही हातावर, कोपर, खांदा आणि शरीराच्या इतर भागावर प्रेसच्या खुणा आढळल्या. दोन्ही डोळे सुजले असून एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी दाम्पत्याला ताब्यात घेतले. निरपराधांचे मेडिकल झाल्यानंतर त्याचे समुपदेशन करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कुटुंबातील इतरांचे जबाब नोंदवत आहेत. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
द्वारका जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, दोघांविरुद्ध ओलीस ठेवणे, मारहाण करणे, जाळणे, गंभीर दुखापत करणे, बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला इंडिगो एअरलाइन्समध्ये पायलट आहे तर तिचा पती कौशिक बागची विस्तारा एअरलाइन्समध्ये ग्राउंड स्टाफ आहे.