Monday, December 23, 2024
Homeविविधदर्यापूरच्या सांगळूदकर नगर मध्ये साचले पावसाचे पाणी...

दर्यापूरच्या सांगळूदकर नगर मध्ये साचले पावसाचे पाणी…

काल दि.१८/०७/२०२३ रोजी दर्यापूर तालुक्यात अति मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे दर्यापूर मधील सांगळूदकर नगर मध्ये पावसाचे पाण्याने मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांची ये-जा करण्यात मोठी कसरत होत आहे. तर या मार्गावरून शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना पायी सुद्धा चालता येत नाही.

येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, येथील परिसर हा पावसाळाभर पावसाच्या पाण्याने साचलेला असतो, तरी या अति गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ मताची मागण्यासाठी पुढारी आमच्या दारात येत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: