सांगली – ज्योती मोरे
मिरजेतील एसटी बस स्थानकात धर्माचा प्रचार करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजप च्या सांस्कृतिक प्रकोष्ट आघाडीकडून आगार प्रमुखांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले दिनांक 13 जुलै रोजी मिरज एसटी बस स्थानकात चालक आणि वाहक बसमध्ये नसताना एक महिला बसमधील बसलेल्या प्रवाशांना एका विशिष्ट धर्माचा आणि देवाचा प्रसार आणि प्रचार करतानाचा असा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
या संदर्भात भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ट आघाडीकडून सदर धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी व असे होत असलेले प्रकार थांबवावेत असे निवेदन देण्यात आले तर याबाबत ची कॉपी माहितीसाठी महात्मा गांधी चौक पोलिसांना देत असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्रचे सह संयोजक ओंकार शुक्ल यांनी दिली आहे यावेळी निलेश साठे, अनिल हंबर,भास्कर कुलकर्णी, महेश नाईक हे उपस्थित होते.