राज्यात राजकारणात क्षणोक्षणी बदल पाहायला मिळत आहे, त्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून शपथ घेतलेल्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून विरोधक हल्ला करीत असताना आता अजित पवार यांच्या सोबत शपथ घेतलेल्या मंत्रांना खाती वाटप केले जाणार असल्याचे माहिती मिळत आहे. तर शिंदे गटातील आमदारांची कोंडी झालेली असल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांना अर्थ खातं मिळू नये यासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहोत त्याच बरोबर शिंदे गटाने सुद्धा जोरदार विरोध केला, मात्र, अजित पवारांच्या दिल्ली वारीने तो तिढा सुटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे. अब्दुल सत्तारांच कृषी खातं राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणण्यात यश आलं आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आता खाते वाटपाचा तिढा नऊ मंत्र्यांना खाती वाटप होणार आहे, तर अर्थ खातं आपल्याकडे घेण्यास अजित पवार यशस्वी ठरले. दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळालेला नसला तरी मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आता खातेवाटप मिळाल्याने राज्यातील जनतेला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीला मिळालेली खाती
अजित पवार – अर्थ, नियोजन
छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण
धर्मरावबाबा अत्राम- औषध व प्रशासन
दिलीप वळसे पाटील – सहकार
धनंजय मुंडे – कृषी
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
अनिल पाटील – मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन
आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण
संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे