पुसद : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सोनेरी पान असलेला धुंदी बेलगव्हाण जंगलातील दहा जुलै 1930 रोजी झालेला ‘जंगल सत्याग्रह’ स्मृतिदिन सोमवार ता.दहा रोजी साजरा करण्यात आला.या जंगल सत्याग्रहाचे प्रणेते लोकनायक बापूजी अणे यांचे बेलगव्हाण जंगलातील स्मृती शिळे जवळ पुष्पचक्र वाहून स्मरण करताना अचानक आग्या मोहोळ प्रजातीच्या मधमाशांनी हल्ला चढवला.त्यामुळे एकच गोंधळ होऊन आमदारांसह जमलेल्या जंगल सत्याग्रह प्रेमींची त्रेधात तिरपट उडाली.मधमाशांनी डंख मारल्याने वन अधिकाऱ्यांसह काहीजण जखमी झाले.
गेल्या कित्येक वर्षापासून धुंदी – बेलगव्हाण जंगलात उभारलेल्या जंगल सत्याग्रहाच्या स्मृती शिळेवर अभिवादन सोहळा आयोजित करण्यात येतो.यासाठी वनविभाग व लोकनायक बापूजी आणि स्मृती प्रतिष्ठान पुढाकार घेते.सोमवारी या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे आमदार निलय नाईक प्रथमच सहभागी झाले होते.त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा पूर्वाध्यक्ष राजेंद्र डांगे,अणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंतराव पाटील कान्हेकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मनीष जाधव,यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य,भाजपचे कार्यकर्ते,जंगल सत्याग्रहप्रेमी नागरिक,पत्रकार व वनअधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.पुष्पांजली अर्पण करताना लोकनायक बापूजी आणि यांच्या तैलचित्राजवळ सुवासिक अगरबत्ती लावण्यात आल्या.
अगरबत्तींच्या धुरामुळे वृक्ष फांद्यावरील आग्या मोहोळ मधमाशां जमलेल्या गर्दीवर तुटून पडल्या .त्यामुळे स्मृतिदिन कार्यक्रम सोहळा सुरू करण्याआधीच गोंधळ उडाला.मधमाशांचा हा हल्ला लक्षात घेताच शेतकरी नेते मनीष जाधव यांनी धोक्याची सूचना दिली व त्वरित बाहेर पडण्यास सांगितले.आमदार निलय नाईक यांच्यासह उपस्थित मंडळी बाहेर पडत असताना मधमाशांनी हल्ला चढविला.वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण राऊत यांनाही मधमाशांनी घेरले.डंख मारल्याने अनेक जण जखमी झाले.मधमाशांनी हल्ला करतात सर्वांनीच आपापल्या वाहनातून लगेचच काढता पाय घेतला.त्यामुळे जंगल सत्याग्रहावरील विचार मंथनाची बैठक उधळल्या गेली.जंगलातील या मधमाशांच्या हल्ल्यामुळे पाहुण्यांच्या स्वागतासाठी आणलेले पुष्पगुच्छ मान- सन्मानापासून वंचित राहिले .त्याचवेळी .मधमाशीच्या डंखाच्या वेदनांची अनेकांना अनुभूती मिळाली…
पुसद वनविभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील कान्हेकर होते.यावेळी आमदार निलय नाईक,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डांगे,निखिल चिद्दरवार,वनपरिक्षेत्राधिकारी प्रवीण राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक समितीचे सचिव श्याम जोशी यांनी केले.यावेळी दिवाकर सरनाईक,मनीष जाधव,ज्ञानेश्वर तडसे,विजय उबाळे,अविनाश पोळकट,नारायण क्षीरसागर, नारायण मुडाणकर, संभाजी टेटर, मिलिंद उदेपूरकर,राजू पाटील,संजय पाटील कान्हेकर,दिगंबर पुंडे,राजाभाऊ देशमुख,श्रीकांत सरनाईक,डॉ. काकण,सुरेश गोफणे,निळकंठ पाटील, निखिल चिद्दरवार,संतोष मुराई, कैलास गावनर,भारत पाटील,संजय कोरटकर, पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेंडकाळे,प्रा. दिनकर गुल्हाने,रवी देशपांडे,ज्ञानेश्वर शिंदे,रेश्मा लोखंडे व वन कर्मचारी उपस्थित होते.
बातमी सौजन्य : दिनकर गुल्हाने, पुसद