रामटेक तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी…
रामटेक तालुक्यातील शेतक-यांना शेतीकरिता तात्काळ पेंन्च जलाशयातील पाण्याची उपलब्धता करावी…
रामटेक – राजू कापसे
गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. यानंतर शासनाच्या आदेशानुसार प्रशाषकीय यंत्रनेकडून पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादरही करण्यात आलेला होता. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही.
तेव्हा याचीच दखल घेत मनसे शेतकरी सेनेच्या एका शिष्टमंडळाने नुकतेच याबाबदचे एक निवेदन स्थानिक तहसिलदार हंसा मोहने यांना देत नुकसान भरपाई तथा शेतीसाठी पेंच जलाशयाचे पाणि सोडण्याबाबद मागणी केलेली आहे.
ऑक्टोंबर – नोव्हेंबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते.
सदर लाभार्थी शेतक-यांची संख्या अंदाजे ४००० (चार हज़ार) असुन तीस ते पस्तीस हजार हेक्टर शेत पिकांचे नुकसान झालेले आहे. ही सर्व रक्कम जवळपास आठ ते नऊ कोटीवर असुन अद्यापपावेतो संबंधीत शेतक-यांना प्राप्त झालेले नाही. तर दुसरीकडे सध्या पावसाळा ऋतु सुरु असला तरी मात्र ज्याप्रमाणात पाऊस पडायला पाहीजे त्या प्रमाणात पडलेला नाही.
तेव्हा पेंच जलाशयाचे पाणी सोडणे गरजेचे असल्याचे निवेदनानुसार शिष्टमंडळाने तहसिलदारांना सांगीतले. यावेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वांदीले, रामटेक तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे, माजी तालुका अध्यक्ष अनिल मुलमुले, रतन वासनीक, प्रफुल्ल पुसदेकर, राकेश चवरे, मयुर तलेगावकर, हर्ष ढगे, श्यामसुंदर नवघरे, मुकेश भोंडेकर, अतुल गजभिये, अमीत बादुले, श्रावण सरोते आदी. उपस्थित होते.