Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीआकोट येथील कुख्यात गुंड एम.पी.डी.ए. ऍक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द...

आकोट येथील कुख्यात गुंड एम.पी.डी.ए. ऍक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द…

ताहपुरा, ईफ्तेखार, आकोट येथे राहणारा कुख्यात गुंड अतहर खान अमीर खान, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी जबरी चोरी करणे, खंडणीची मागणी करणे, चोरी करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, घातक शस्त्र बागळुन गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहाण करणे, जातीय तणाव निर्माण करुन जातीय दंगल घडवुन आणणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्याचे वर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन त्याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता.

जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २९/०८/२०२२ रोजी पारीत केला.

त्यानुसार अतहर खान अमीर खान याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील केला गेला.त्यानंतर त्यास दिनांक २९/०८/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच सहायक पोलीस अधीक्षक, आकोट उप विभाग, आकोट, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले,

पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. आकोट शहर येथील पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि पो.स्टे. तील कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली आहे.

त्यांचे विरुध्द एम.पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे जुलै २०२० ते ऑगष्ट २०२२ हया कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ७६ गुन्हेगारांनावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: