Monday, December 23, 2024
Homeराज्य१ जुलैला गुणवंत विद्यार्थी, उत्कृृृृष्ट अधिकारी,खेळाडूंचा सत्कार...

१ जुलैला गुणवंत विद्यार्थी, उत्कृृृृष्ट अधिकारी,खेळाडूंचा सत्कार…

नमो नमो मोर्चा भारत चे आयोजन…

राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांचा जन्मदिनाचे औचित्य…

रामटेक – राजू कापसे

दिनांक १ जुलै २०२३ रोजी नमै नमो मोर्चा भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्य साधुन अधिकारी,कर्मचारी, गुणवंत विदयार्थी, उत्कृष्ट खेळाडू, शिक्षक, प्रशिक्षक, समाजसेवी,पत्रकार यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ग्रामीण भागातील समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी व शिक्षकांच्या कठोर परिश्रम व प्रयत्नांचे तसेच गुणवंत विदयार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी तसेच इतरांना प्रेरणा मिळावी या उद्रदेश्याने आयोजित करण्यात येणार आहे,

मागील २०१६ पासून नमो नमो मोर्चा भारत यांच्या विदयमाने दरवर्षी असा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावर्षी सुध्दा १ जूलैला सायं.४ वाजता शांती मंगल कार्यालय रामटेक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्रातील २०२३ मध्ये १० वी आणि १२वी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचे सत्कार करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक परशुरामजी खुने, पद्मश्री पुरस्कृत भारत सरकार, सह.उद्घाटक हेमंतजी नागपुरे साहेब, उद्योजग तर विशेष अतिथी म्हणुन चन्द्रशेखरजी बावनकुळे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सन्माननीय रामदासजी तडस सांसद, वर्धा उपस्थित राहतील.

कार्याक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी मेहर (बाबूजी), वेसनमुक्ती महाराष्ट्र पुरस्कृत हे करतील. प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक, सन्माननीय श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपुर , सन्माननीय श्रीमती डॉ. माधवी खोडे़, मा. अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर सन्माननीय डॉ. विपिन इटनकर, मा. जिल्हाधिकारी, नागपूर सन्माननीय श्री संजयजी पाटील, मा. अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा,

नागपूर, सन्माननीय श्रीमती. सौम्या शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर सन्माननीय श्री सिद्धार्थजी गायकवाड मा. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग , नागपूर, सन्माननीय श्रीमती संघमित्रा ढोके, मा. उप संचालक नगर पालिका प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर, सन्माननीय श्री विशाल आनंद, मा. पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण, सन्माननीय श्री पी. टी. देवतळे, मा. उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, नागपूर, सन्माननीय श्री उल्लासजी नरड साहेब, मा. शिक्षण उपसंचालक,

नागपूर विभाग, सन्माननीय श्री किशोरजी भोयर साहेब मा. समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, सन्माननीय श्रीमती वंदना सवरंगपते एसडीओ, रामटेक , सन्माननीय श्रीमती पल्लवी दिलीप राउत, मुख्याधिकारी, नगर परिषद, रामटेक सन्माननीय श्री हृदयनारायण यादव मा. पोलिस निरीक्षक, रामटेक, सन्माननीय श्रीमती हंसा मोहने मा. तहसीलदार,

रामटेक,सन्माननीय श्री. जयसिंह जाधव गट विकास अधिकारी रामटेक, सन्माननीय श्रीमती योगिता चाफले मा. डी. वाय. एस. पी, गोंदिया हे उपस्तीत राहतील. कार्यक्रमाचे आयोजक एन.एन.एम.बी, फाउंडेशन (NNMB FOUNDATION) , श्री. अजय खेडकर, जिल्हा अध्यक्ष बेटी बचाओ बेटी पढा़ओ,

नमो नमो मोर्चा भारत, रामटेक-पारशिवनी तालुका पत्रकार संघ , श्रीमती. कांचन माकडे, महिला जिल्हा अध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत हे आहेत. या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान आयोजकांनी केले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: