Monday, December 23, 2024
Homeराज्यनरेंद्र मोदी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात खोटे बोलणारे पंतप्रधान - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या...

नरेंद्र मोदी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात खोटे बोलणारे पंतप्रधान – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सांगलीत टोला…

सांगली – ज्योती मोरे

नरेंद्र मोदी हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात खोटे बोलणारे पंतप्रधान असून, असा पंतप्रधान आतापर्यंतच्या काळात पाहिला नाही, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगली येथे व्यक्त केला. कर्नाटकातील काँग्रेसच्या यशानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पहिलाच दौरा महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित केला होता.

कल्पतरूम ग्राउंड वर संपन्न झालेल्या या महानिर्धार मेळाव्या प्रसंगी ते उपस्थितांसमोर बोलत होते.यावेळी त्यांचा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार ही करण्यात आला.

दरम्यान बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. भाजपा सरकारकडून लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम होत असून हे सरकार नालायक सरकार आहे.गोरगरिबांच्या विरोधातलं सरकार आहे,असा टोलाही सिद्धरामय्या यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, जत तालुक्यातील जनतेला पाणी देण्यासाठी कर्नाटक सरकारने सहाय्य करावे अशी मागणी माजी मंत्री आम. विश्वजीत कदम यांनी केली होती. याला उत्तर देताना लवकरच चर्चा करून हा प्रश्न सोडवला जाईल ,असे आश्वासन ही सिद्धरामय्या यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

krishna vally school sangli

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार बंटी पाटील,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,प्रकाश हुकिरे,निरीक्षक संजय बालगुडे, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, मधुकर चव्हाण,आम. आजगावकर, आम.मोहनराव कदम, बसवराज पाटील, माजी आम. काकासाहेब पाटील,

प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष आम. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष उपाध्यक्ष शैलजा पाटील जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: