पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे रविवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. येथील ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही मालगाड्यांचे इंजिन केवळ रुळावरून घसरले नाही तर जागीच उलटले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये रेल्वे ट्रॅक आणि मालगाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. या घटनेनंतर खरगपूर-बांकुरा-आद्रा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. या घटनेत किती नुकसान व जीवितहानी झाली याबाबतची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही.
आज पहाटे 4 वाजता ही भीषण दुर्घटना घडली. एक मालगाडी बांकुराहून बिष्णूपूर येथे जात होती. त्यावेळी ओंदा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळावरील लूप लाइनवर आणखी एक मालगाडी उभी होती. मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावरील मालगाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की मालगाडीचे डब्बे पटरीवरून उतरून एकमेकांवर चढले. मालगाडीचे एकूण 12 डब्बे रेल्वे रुळावरून उतरले आहेत. दोन्ही मालगाड्या रेल्वे रुळावरच पलटी झाल्या आहेत. त्यामुळे इतर रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. या अपघातामुळे पुरुलिया हावडा एक्सप्रेस रद्द करण्यता आली आहे. अनेक ठिकाणी एक्सप्रेस थांबवण्यात आल्या आहेत. तर पोरबंदर संतरागाछी एक्सप्रेसला पुरुलिया स्टेशनहून चांडील टाटानगर मार्गे पाठवले जात आहे.
खाली व्हिडिओ पाहा
#WATCH | West Bengal: Two goods trains collided at Onda railway station in Bankura. Rail operation on Kharagpur–Bankura–Adra line has been halted. More details awaited. pic.twitter.com/T4sL5rn7Rp
— ANI (@ANI) June 25, 2023