Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingविहिरीत पडला होता बिबट्या…त्याला बाहेर काढण्यासाठी केला असा 'जुगाड'…Viral Video

विहिरीत पडला होता बिबट्या…त्याला बाहेर काढण्यासाठी केला असा ‘जुगाड’…Viral Video

Viral Video : सोशल मिडीयावर अनेक प्राण्यांना वाचवण्यासाठी लोक अनेक युक्ता करतात आणि प्राण्यांना बाहेर सुरक्षित काढतात. असाच व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एका बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जीव धोक्यात घालून नवी युक्ती करीत त्याला जीवदान दिले.

ट्विटरवर बिबट्याच्या बचावाचा व्हिडिओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये, खोल विहिरीत पडलेल्या आणि अडकलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी वनविभागाचे काही कर्मचारी व ग्रामस्थ सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत.

सहाना सिंगने शेअर केलेल्या या क्लिपमध्ये गावकरी घाबरलेल्या बिबट्याला बाहेर पडण्यासाठी विहिरीच्या आत पेटलेली मशाल टाकताना दाखवले आहेत. क्लिप जसजशी पुढे जाईल तसतसा बिबट्या गावकऱ्यांनी खाली पडलेल्या बिबट्याला शिडीच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढतांना दिसत आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “कर्नाटकात कुठेतरी. एक बिबट्या विहिरीत पडला आणि त्याला बहर काढण्यासाठी विहिरीत शिडी सोडली असता तो सहजासहजी बाहेर येत नव्हता म्हणून त्यांनी त्याच्याजवळ जळती मशाल नेली असता त्याने थेट शिडीच्या साह्याने विहिरी बाहेर पळण्यास भाग पाडले. गावकऱ्यांचा जुगाड पाहून नेटकर्यांनी स्तुती सुमने वाहिले…
खाली Video पाहू शकता…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: