सांगली – ज्योती मोरे
कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर प्रथमच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 25 जून रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून त्याची सुरुवातसांगली पासून होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सांगलीतील नेमिनाथ नगरातील कल्पद्रुम ग्राउंड वर संपन्न होत आहे.याचबरोबर शेतकऱ्यांचा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा ही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या जय्यत तयारीसाठी आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेस भवन मध्ये पार पडली.सदर बैठकीस सत्कार समितीचे अध्यक्ष बसवराज पाटील ,माजी मंत्री आम. विश्वजीत कदम , पक्षनिरीक्षक संजय बालगुडे,जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आदी मान्यवरांसह तालुका अध्यक्ष,पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.