सांगली – ज्योती मोरे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेले परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील एकूण दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यापैकी एक मिरजेतील निहाल कोरे यांची निवड झालेली आहे या निवडीने मिरजसह मिरज तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून निहाल कोरे यांचा सत्कार जैलाब शेख मित्र मंडळ व कुटुंबाकडून शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ व पेढे भरवून करण्यात आला.
यावेळी निहाल कोरे म्हणाले की तरुणाने जिद्दीने अभ्यास करून एक चांगला असा अधिकारी व्हावा आई-वडिलांचे स्वप्न साकार कारा.कोरे म्हणाले की माझ्या घरची परिस्थिती ही देखील गरिबीची होती मी परिस्थितीवर मात करून कुठेही ट्युशन अथवा शिकविनी न लावता दिवस आणि रात्र अभ्यास करून जिद्द व चिकाटीने मी माझे ध्येय पूर्ण केले.
सत्कारला उत्तर देताना सर्वांचे आभार मानून परत एकदा तरुणांनी फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून एक उत्तम असा अधिकारी होऊन देशासह जनतेचे सेवा करावी असे यावेळी म्हणाले. यावेळी जैलाब शेख,नारायण बेळगावकर, एजाज कादरी,जमीर शेख,नासिर शेख,वसीम मकानदार, सौ लतिफा शेख साद गवंडी आदी उपस्थित होते.