अकोला जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहीगाव गावंडे शेतशिवारातील आढळून आलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं तर जन्मदात्या आईची पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली असून त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.
बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहिगाव गावंडे शेतशिवारात दि. ६ जून रोजी ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने शोध घेत हत्येचे गूढ उकलले. तेव्हा मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
हत्येच कारण आल समोर…
त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. मुलाने शिक्षण सोडून दिलं होतं, म्हणजेच शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. हत्येच्या दिवशी देखील आई आणि मुलामध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं.
मृतक महिला कामासाठी पारसला रेल्वेने ये-जा करत असे. दररोज प्रमाणे ४ जून रोजी देखील दहिगाव गावातून शेत रस्त्याने मिर्झापुर मार्गे बोरगांव मंजू रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली होती. संगीता ही रस्त्याच्या मधोमध म्हणजेच सामसूम शेत रस्त्यात पोहोचली असता, तेव्हा तिच्याच मुलाने इथं येत दगडाने आईच्या डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी वार खून केला.
हत्येनंतर मृतदेह कोणाला दिसून येऊ नये याकरीता रस्ताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये टाकून त्यावर काटेरी झुडपं टाकून झाकून टाकलं. पुढं ६ जून रोजी तिचा मृतदेह आढळून आला अन् संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस स्टेशन संजय खंदाडे हे करीत आहे.