नांदेड – महेंद्र गायकवाड
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेड शहरात आज भव्य जाहीर सभा होणार त्या सभेच्या अनुषंगाने काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली असून अशोकराव चव्हाण यांनी विद्यमान नेतृत्व कमजोर असल्याने भाजप जोर लावण्याचा प्रयत्न करित आहे.राजकीय मैदान सर्वांसाठी खुले आहे असे म्हण्टले आहे.
‘मोदि@९’ महाजनसंपर्क अभियानंतर्गत राज्यभर कार्यक्रम सुरु आहेत. या अभियानाच्या माध्यमातून नांदेड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भव्य जाहीर सभा पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोगा जनतेसमोर मांडणारे महाजनसंपर्क अभियान महाराष्ट्रात सुरु आहे. त्या पार्शवभूमीवर देशाचे गृहमंत्रिअमित शाह यांची महाराष्ट्रातील अभियानातर्गत आज नांदेड अबचल नगर येथे जाहीर सभा होणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यात मोठी ताकद असून जिल्हा परिषद,महानगर पालिका अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, विविध सोसायट्या ,मार्केट कमिटी वर त्यांचे वर्चस्व आहे.नांदेड जिल्हा हा त्यांचा बालेकिल्ला आहे.त्यामुळे प्रत्येका विरोधी पक्ष नांदेड पासूनच सुरुवात करित आहेत नव्यानेच स्थापन झालेला भारत राष्ट्र समिती पक्षाने देखील नांदेडलाच आपले लक्ष्य केले आहे.
भारत राष्ट्र समितीचे सर्वोसर्वा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी देखील नांदेड येथूनच मराठवाड्यात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. सर्व पक्षाला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक महत्वाची असल्याने आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे व कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विज्यामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण मानले जात आहे. दरम्यान अशोकराव चव्हाण यांनी भाजपच्या सर्व्हेमध्ये नांदेडमधील विद्यमान नेतृत्व कमजोर असल्याचे वाटत असल्याने व इतर ठिकाणी भाजप कमजोर असल्याने भाजपकडून जोर लावण्यात येत आहे.
लोकशाही मध्ये राजकीय मैदान सर्वासाठी खुले असून शेवटी कुणाला पुढे करायचं हे जनता जनार्धन ठरवेल अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण व्यक्त केली आहे.